पुणे, दि.१०:- पुणे परिसरातील अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे
अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रवीण तुकाराम कुडले (वय-29 रा. क्रांतीसेन कमानी शेजारी, सुतारदरा, कोथरुड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहेत. प्रवीण कुडले याला एमपीडीए कायद्यान्वये येरवडा कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.कुडले हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोथरुड उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवार, कोयता, चाकू, सुरा यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, दंगा, मारामारी, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे अलंकार पोलीस ठाण्यात दाखल आहेत.प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. अलंकार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बर्गे पोलीस निरीक्षक संगिता पाटील व पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षात 49 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.