पुणे ग्रामीण, दि.१० :-पुणे ग्रामीण दौंड परिसरातील किराणा मालाचे ठोक व्यापारी भक्तु नवदमल सुखेजा वय ६५ वर्षे रा . फराटेगल्ली , दौंड जि . पुणे यांच्याकडील १९ लाख ६४ हजार रूपयांच्या लूट प्रकरणात दौंड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे . अटकेतील संशयित आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी एकूण ६ लाख ५२ हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत . दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. ६ डिसेंबर रोजी भक्तू नेवदमल सुखेजा ( वय ६५ ) हे नेहमीप्रमाणे दुकानामधील दिवसभराचे काम उरकुन मालविकी करून जमा झालेली रक्कम कापडी पिशवीमध्ये ठेवुन ते पैसे घेवून दुकानातून रात्री १०.१५ वाजण्याचे सुमारास दुकानातून पायी घराकडे जात असताना पाच तरुणांनी त्यांच्याकडील रोकडची पिशवी हिसकावून सिंधीमंगल कार्यालाजवळ सिमेन्ट रोडवरत अचानक ५ अनोळखी इसमांनमधील एकाने त्यांचे हाताला हिसका मारून पैशाने भरलेली पिशवी त्यांचे हातातुन हिस्कावून पळवुन घेवुन जाताना त्यातील एका अनोळखी इसमाने मिरचीची पुड उधळली त्यामुळे त्यांचे डोक्याची जळजळ सुरू झाली त्यावेळी त्यांनी आरडा ओरडा केल्याने जवळ असलेले लोकांनी त्यांचा पाठलाग केला परंतु सदरचे ५ अनोळखी इसम हे गोवा गल्लीतुन रेल्वे लाईनचे बाजुला अंधारात काट्यामध्ये पळून गेले होते .
त्यानंतर तात्काळ पोलीस निरिक्षक विनोद घुगे दौड पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व डिबी पथक असे ३ पथके तात्काळ तयार करून जोरात शोध मोहिम चालू केली होती . त्यावेळी त्यांनी घटनास्थळाजवळचे साक्षिदार व सी . सी . टि . व्ही ची माहिती घेवून संशयित आरोपींची माहिती तयार करून त्यांचे रेकॉर्ड घेवुन आरोपी शोधकामी डि . बी . पथकातील सपोनि तुकाराम राठोड , पोसई शहजी गोसावी , पोसई महेश अबनावे , पो.हवा . सुभाष राऊत , पो . ना . अमोल गवळी , पो . ना रणजित निकम , पो.ना. विशाल जावळे , पो . ना . अमिर शेख , पो को अमोल देवकाते असे देहुरोड ता वडगांव मावळ जि . पुणे या ठिकाणी जावुन संशयित आरोपी नामे कमल उर्फ कोमल बाबू हिरमटकर ( वय २८ , रा . गांधीनगर , देहूरोड , सध्या रा . गोवा गल्ली , दौंड ) , प्रदीप उर्फ गणेश महेश कोळी ( वय १९ , रा . तेलगु कॉलनी , संभाजीनगर , दौंड ) , आकाश आरमुगम पिल्ले ( वय ३१ , रा . देहूरोड , जि . पुणे ) व एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे . टोळीतील एक संशयित आरोपी फरार आहे .भक्तू सुखेजा यांच्या दुकानाशेजारील रिक्षांमध्ये बसून टोळीने त्यांच्यावर पाळत ठेवून ही लूट केली . देहूरोड येथील आरोपी रेल्वेने आले होते व लूट केल्यानंतर रेल्वे लोकोशेड परिसरातील काटवनात लपून बसले होते. त्यानंतर त्यांनी एका खासगी वाहनाने पुणे गाठले. लुटीच्या पैशातून त्यांनी पुण्यात कपडे खरेदी करून बुधवार पेठेतील एका वेश्यालयात वेश्यागमन केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे .आरोपी यांना दि १३/१२/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक. अभिनव देशमुख , अपर पोलीस अधिक्षक. मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक , विनोद घुगे हे करीत आहेत . सदर कारवाईमध्ये दौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विनोद घुगे , सपोनि आर बी अधिकारी , सपोनि तुकाराम राठोड , पोसई शहाजी गोसावी , पोसई महेश अबनावे , पोसई भगवान पालवे , पोसई सुशिल लोंढे , सहा फौजदार दिलीप भाकरे , सहा फौजदार पोपट जाधव , सहा फौजदार महेंद्र गायकवाड , पो.हवा . सुभाष राऊत , पो.हवा पांडुरंग थोरात , पो . ना . अमोल गवळी , पो.ना. रणजित निकम , पो ना विशाल जावळे , पो . ना अमिर शेख , पो कॉ सागर गायकवाड , पो का अमोल देवकाते , पो . ना . सचिन बोराडे , पो . ना . अण्णासाहेब देशमुख , पो . ना . नारायण वलेकर , पो को गिरमे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केलेली आहे .