पुणे,दि१२: -आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका पेपर फुटीचा म्हाडामधील पदांच्या भरती प्रक्रियेतील परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर सोपवली होती त्या कंपनीचा मालकच प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असल्याचे पुणे शहर पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले असून पुणे पोलिसांनी या टोळीतील सहा जणांना.आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचा तपास सुरू असताना त्या टोळीचाच या पेपरफुटी प्रकरणात असणारा सहभाग समोर आला आहे. आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील तीन आरोपींना या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यात आले.आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून म्हाडाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होते. त्याच आधारे कौशल्याने तपास करत हे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले.संतोष हरकळ, अंकुश हरकळ (दोघे रा. बुलढाणा), प्रीतेश देशमुख (पुणे), अजय चव्हाण, कृष्णा चव्हाण आणि अंकित चनखोरे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयात त्यांना हजर केले असता 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.हरकळ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात एजंट
आहे तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रश्नपत्रिका तयार करणारा अधिकारी आहे.पोलिसांनी आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात एकूण 17 आरोपींना अटक केली होती. त्यामधे टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि अंकित चनखोरे यांचा समावेश होता. त्यांच्या अंगझडतीमध्ये म्हाडाच्या परिक्षेस बसणाऱ्या तीन परिक्षार्थींची प्रवेश पत्रे, मूळ शैक्षणीक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश सापडले होते. यामुळे पोलिसांना या आरोपींचा म्हाडाच्या परीक्षेशी काही तरी संबंध असल्याचा संशय आला होता. त्यामुळे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यांना शनिवारी रात्री एका कारमधून ताब्यात घेतले. त्यावेळी कारमध्ये प्रीतीश देशमुख होता. प्रितीश देशमुख हा म्हाडाच्या लेखी परिक्षा घेण्यात येणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आहे. त्याच्या झडतीमध्ये लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या लेखी परिक्षेचे पेपर सापडले. तसेच त्याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हमध्येही पेपर आणि अन्य कागदपत्रे सापडली. या तीघांनाही अटक करण्यात आली.
‘लष्कर, आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुट प्रकरणी खासगी क्लास चालकांचा मोठा हात आहे. त्यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पेपर देण्याचा प्रयत्न केला आहे. पेपर फुटी प्रकरणातील टोळ्या औरंगाबादवरुन सक्रीय असल्याचे पुढे आले आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात गोपनियतेचा भंग झाला आहे. तातडीने कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला.’सदर गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक कुमार घाडगे , पोलीस निरीक्षक मीनल पाटील आणि पोलीस उप निरीक्षक अनिल डफळ यांनी बहूमोल कामगिरी केली आहे . सदर गुन्ह्याचा तपास अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , श्रीमती भाग्यश्री नवटके , पोलीस उप आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , पुणे शहर , विजयकुमार पळसुले , सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण हे करीत आहेत .