पुणे, दि.१२ :- कोथरुड येथील शंकरराव मोरे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा आज (रविवार) पुण्यात पार पडली. पोलीस भरतीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली होती.मात्र, कोथरुड येथील शंकरराव मोरे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाला पकडले आहे मोबाईलचा वापर करुन कॉपी करताना केतन विठ्ठल लखवाड (वय 24, रा. मंबापूरवाडी, ता खुलताबाद जि औरंगाबाद असे कॉपी करताना रंगेहात पकडलेल्या परीक्षार्थीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा शंकरराव मोरे विद्यालय कोथरूड या ठिकाणी होती.या परीक्षेमध्ये परीक्षार्थी केतन लखवाड हा परीक्षा चालू असताना मोबाइलचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असताना आढळून आला. त्याला रंगेहात पकडून त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार
आणि कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगतापयांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोथरूड पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.