• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home क्रीडा

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद:खेलो इंडियाचा शानदार समारोप आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव -केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/01/2019
in क्रीडा
Reading Time: 2 mins read
0
महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद:खेलो इंडियाचा शानदार समारोप  आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव -केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
0
SHARES
32
VIEWS

पुणे दि. २० : खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली.

महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या पुरस्कार वितरण श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहूल भटनागर, स्पोर्ट ॲथॉरीटी ऑफ इंडियाच्या (साई)महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा)वंदना कृष्णा, स्पोर्ट ॲथॉरीटी ऑफ इंडियाच्या (साई) उप महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ऑलिम्पिक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी तथा सह सचिव ओंकार सिंग, स्टार स्पोर्टचे चैतन्य दिवाण आदी उपस्थित होते.

श्री प्रकाश जावडेकर म्हणाले, देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया उपक्रम सुरू केला. या निमित्ताने देशभरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे, मैदानावर घडणारा हाच उद्याचा नवा भारत आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ सुध्दा महत्वाचा भाग आहे. क्रीडांगणावर खेळताना निघणारा घाम हेच खेळाडूंचे खरे बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले.

जगात हिंदुस्थान अव्वल व्हावा – विनोद तावडे

क्रीडा मंत्री विनोद तावडे म्हणाले, खेलो इंडियाच्या आयोजनाची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात राज्याच्या क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. ही स्पर्धा यशस्वी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पहिला आला याचा मनस्वी आनंदच आहे, मात्र जगात क्रीडा क्षेत्रात हिंदुस्थान अव्वल व्हावा हीच अपेक्षा आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील प्रतिभाशाली खेळाडू पुढे आले असून तेच आपल्या देशाचा झेंडा जगात उंचावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेलो इंडिया युथ गेम्सचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ‘साई’च्या महासंचालक नीलम कपूर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

खेलो इंडियाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र क्रीडा पथकाचे प्रमुख विजय संतान यांच्यासह खेळाडूंनी स्वीकारला. व्दितीय क्रमांकाचा चषक हरियाणा संघाला तर तृतीय क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीच्या संघाच्या पथक प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते चषक देवून सन्मानित करण्यात आले.

 

खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ ची पदकतालिका
क्रम राज्य.             सुवर्ण    रौप्य    कास्यं     एकूण
१ महाराष्ट्र .               ८५      ६२      ८१.      २२८
२  हरयाणा               ६२      ५६.     ६०       १७८
३ दिल्ली                  ४८ .     ३७.     ५१      १३६
४ कर्नाटक               ३०       २८.      १९ .     ७७
५ तामिळनाडू           २७       ३५ .     २५ .    ८७
६ उत्तरप्रदेश             २३ .     २५ .      ४०     ८८
७ पंजाब                 २३        १९       ३०.     ७२
८गुजरात                १५        ०९        १५.     ३९
९ पश्चिम बंगाल.      १३.       १५        १६      ४४
१० केरळ .             १२        १६.        ३० .   ५८
 रविवारी (दि.२०) दिवसभरात 
व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश
महाराष्ट्राच्या मुलींना १७ वर्षाखालील गटात पुन्हा रौप्यपदक मिळाले. अंतिम फेरीत त्यांना पश्चिम बंगाल संघाकडून १५-२५, १३-२५, १४-२५ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राकडून श्रुती मासळे व तेजस्विनी मलगुंडे यांंनी कौतुकास्पद खेळ केला. पश्चिम बंगालकडून दिशा देवांशी व ईशा घोष यांनी स्मॅशिंगमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. गतवर्षीही महाराष्ट्राला अंतिम फेरीत पश्चिम बंगाल संघानेच पराभूत केले होते.
मुलांच्या २१ वर्षाखालील गटात केरळ संघाने अजिंक्यपद पटकाविले. उत्कंठापूर्ण अंतिम लढतीत त्यांनी तामिळनाडू संघावर २१-२५, २५-१५, २५-२३, २५-२० असा विजय मिळविला. त्याचे श्रेय रुनी सेबॅस्टियन व राहुुलकुमार यांच्या चतुरस्त्र खेळास द्याावे लागेल.
 तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध
एकाग्रता व जिद्द यांचा सुरेख समन्वय राखून साक्षी शितोळे व ईशा पवार या महाराष्ट्राच्या खेळांडूंनी तिरंदाजीमध्ये सुवर्णवेध घेत आपल्या राज्यास खेलो इंडिया महोत्सवात यशस्वी सांगता करुन दिली. प्रथमेश जावकर याचे सुवर्णपदक केवळ एका गुणाने हुकले.
आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युट येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत साक्षी हिने २१ वर्षाखालील मुलींच्या विभागात रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम फेरीत पश्चिम बंगालच्या सुपर्णा सिंग हिला ६-० अशा फरकाने हरविले.
शेतक-याची पोर लई हुशार
साक्षी ही पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्याालयात शिकत असून ती रणजीत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचा सराव करते. साक्षी ही मूळची दौंड तालुक्यातील पाडवी या खेडेगावची असून तिचे वडील शेतकरी आहेत. तिने आतापर्यंत चार वेळा आशिया चषक स्पर्धेत भाग घेत दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. साक्षी हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले, येथे सुवर्णपदक मिळविण्याची मला खात्री होती. खेलो इंडिया महोत्सव हा आॅलिंपिकसाठी महत्त्वाचा असल्यामुळे येथील विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
मुलींच्या १७ वर्र्षालील गटात ईशा पवार हिने कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक राखले. तिने १५० गुणांपैकी १४५ गुणांची कमाई करीत उल्लेखनीय कामगिरी केली. या प्रकारात राज्य विक्रम नोंदविणाºया ईशा हिने गतवेळीही खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अखिल भारतीय स्तरावर तिला अग्रमानांकनही असून ती गेली चार वर्षे ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. डेरवण येथील एस.व्ही.जे शिक्षण संस्थेत ती शिकत असून गतवर्षी तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंधरा वषार्ची खेळाडू ईशा म्हणाली, या सुवर्णपदकाचे श्रेय माझ्या पालकांना व प्रशिक्षक घाडगे यांना द्यावे लागेल. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या खेळात आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकले आहे. आगामी युवा जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत सर्वोच्च यश संपादन करण्याचे माझे ध्येय आहे.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात प्रथमेश याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १५० गुणांपैकी १४२ गुण मिळविले. दिल्लीच्या ऋतिक चहल याने १४३ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. उत्कंठापूर्ण लढतीत त्याने ऋतिकला चिवट झुंज दिली मात्र शेवटच्या महत्त्वपूर्ण क्षणी त्याला वाºयाचा अंदाज आला नाही व त्याचे सुवर्णपदक हुकले.
* टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई
महाराष्ट्राच्या सृष्टी हळगेंडी हिला २१ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला कास्यंपदकाची कमाई झाली. मुलांच्या १७ वर्षाखालील दुहेरीत महाराष्ट्राच्या हृषिकेश मल्होत्रा व दीपित पाटील या जोडीला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.
सृष्टी ही मुंबईत आरे पोद्दार महाविद्यालयात शिकत आहे. ती ठाणे येथे शैलजा गोहाड यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून आजपर्यंत तिने राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांमध्येही तिने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
स्पर्धेबाबत ती म्हणाली, येथील वातावरण खूप प्रोत्साहनवर्धक होते. येथील सर्व सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होत्या. खेलो इंडिया ही संकल्पना खूपच चांगली असून अशा महोत्सवातून भावी आॅलिंपिक पदक विजेते घडविण्यास मदत होणार आहे. टेबल टेनिसमधील खेळाडूंना भरपूर सुविधा व सवलती मिळू लागल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या संधीही मिळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमक दाखवू लागले आहेत. भारतीय संघात स्थान मिळविण्याचे माझे ध्येय असून ते साकार करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. मला पालकांकडून भरपूर प्रोत्साहन मिळत आहे.

घुमला शिवछत्रपतींचा जयघोष…

सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक महाराष्ट्राच्या संघाला मिळाल्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा जल्लोष सुरू होता. मान्यवरांच्या हस्ते चषक स्वीकारल्यानंतर पथक प्रमुखांनी महाराष्ट्राचे सर्व विजेते खेळाडू असलेल्या मंचावर चषक नेला. त्या ठिकाणी विजेतेपदाचा चषक नेल्यानंतर विजेत्या खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, त्याला समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांनी जोरदार साथ दिली, त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ शिवछत्रपतींचा जयघोष दुमदुमत होता.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

“थॅक्स गिव्हींगला आलोय”!-पशु संवर्धनमंत्री महादेव जानकर

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे वायसीएम रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडीत;

Next Post
पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे वायसीएम रुग्णालयाचा विद्युत पुरवठा  खंडीत;

पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे वायसीएम रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडीत;

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: