पुणे,दि.२६ :- पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका युवकाचा तलवारीने वार करून खून झाल्याची घटना घडली आहे.ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या घडली आहे. चितळे लेनजवळ रक्ताच्या थारोळयात तरूण पडला होता. त्यास तातडीने रूग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचलेआहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राजेंद्र जाधव नावाच्या 20 वर्षीय तरूणाचा तलवारीने वार करून खून झाला आहे. अनिलची बहिण कर्वेनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. तो तिला सोडण्यासाठी आला असताना ही घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनिल जाधव याच्यावर तिघांनी तलवारीने वार केले आहेत.व तिघांनी त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर तलवारीने वार केले. त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील, उपनिरीक्षक लहाने, उपनिरीक्षक सपताळे, कर्मचारी पवार, राठोड, गायकवाड, केकाण,
गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अलंकार पोलिस ठाण्याचे अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतले आहे.परिसरातील CCTV फुटेजमध्ये काही कैद झाले आहे