सिंधुदुर्ग,दि २६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार आज रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्याच्या विकासकामांना दिलेल्या निधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
मात्र या दौऱ्यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीच्या चालकाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाने केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तृप्ती मुळीक या चालकाच्या जागी बसलेल्या दिसत आहेत. तर गाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे दिसत आहे.