पुणे ग्रामीण, दि.२६ :- पुणे जिल्ह्यातील पाटस परिसरात रविवारी (दि.२६) मध्यरात्रीच्या सुमारास गांजा सह ७८ लाख १०हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.याप्रकरणी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश येथील 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक केली आहे. ही कारवाई मध्यरात्री एकच्या सुमारास करुन एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे.आरोपींनी हा गांजा पुणे जिल्ह्यातील काही दुकानात आणि मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आला होता, असा संशय पोलिसांना असून यामध्ये जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबई येथे विक्रीसाठी ट्रकमधून गांजाच्या पिशव्या नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाटस परिसरात सापळा रचून मिळालेल्या नंबर वरून ट्रक आडवला.ट्रकची तपासणी केल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये गांजाच्या पिशव्या आढळून आल्या.त्यामध्ये तीस लाख रुपये किंमतीचा पावणे दोनशे किलो गांजा होता.पोलिसांनी ट्रक आणि गांजा असा एकूण ७८ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुरुष आरोपी नामे १ ) रविकुमार जागेश्वराव पुपल्ला रा . झमिदागुमिल्ली वागुमिल्ली ता . जि.क्रिष्णा राज्य आंध्रप्रदेश २ ) रवि कॉटया अजमेरा रा . विजयवाडा ता . कंखीपाट जि.कृष्णा राज्य आंध्रप्रदेश ३ ) उमेश खंडु थोरात रा.मंचर ता . आंबेगाव जि . पुणे ४ ) युवराज किसन पवार रा.मुथळा ता . मुथळा जि . बुलढाणा ५ ) उत्तम काळु चव्हाण रा . करवंड ता . चिखली जि.बुलढाणा ६ ) प्रकाश एन व्यंकेटेश्वराव रा . विजयवाडा ता.कृष्णा जि.कळीवाळ राज्य आंध्रप्रदेश ७ ) किसन शालीमार पवार रा . मुथळा ता.मुथळा जि . बुलढाणा व महिला आरोपी नामे १ ) रुक्मिणीबाई रुपराव पवार रा . ढाकरखेड ता . चिखली जि . बुलढाणा २ ) मिना युवराज पवार रा . ढाकरखेड ता . चिखली जि . बुलढाणा ३ ) ममता उत्तम चव्हाण रा . करवंड ता.चिखली जि . बुलढाणा ४ ) लालाबाई देवलाल चव्हाण रा.चिखली ता . चिखली जि . बुलढाणा ५ ) ललिता हिरालाल पवार रा . रा.ढाकरखेड ता.चिखली जि . बुलढाणा असे ७ पुरुष ५ महिला असे एकुण १२ आरोपी अटक केले आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते , बारामती विभाग , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण पवार , स.पो. नि केशव वाबळे , पो.स.ई पदमराज गंपले , पो.ना. गणेश सोनवणे , पो.ना विशाल गजरे , पो . ना . विकास कापरे , पो हवा . जे . एम . भोसले , पो.हवा . भानुदास बंडगर , पो . ना . रविंद्र गोसावी , पो.ना मेघराज जगताप , पो.ना. महेंद्र चांदणे , पो.ना. नुतन जाधव , पो.ना.प्रमोद गायकवाड , पो.शि.सुजित जगताप , पो.शि.दिपक यादव , पो.शि. तात्याराम करे , पो . शि . गणेश मुटेकर , पो.शि. आनंद आहेर , म.पो.शि. धावडे , चालक सहा फौज . सत्यवान जगताप , पो.ना. विजय आवाळे , पोलीस मित्र रामा पवार , निखिल अवचट यांनी कारवाई केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत .