• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

रोजगार ऐवजी डान्सबार, छावणी ऐवजी लावणी; देणा-या सरकारचा तीव्र निषेध…..वैशाली काळभोर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/01/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

पिंपरी, दि २० :-प्रतिनिधी राजेश लांडगे,  दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, मागेल तेथे टँकरने पाणी पुरवठा करु, ग्रामिण भागात मागेल त्या गावात जनावरांसाठी चारा छावणी उभारु असे पोकळ आश्वासन देणा-या सरकारने रोजगारा ऐवजी डान्सबार सुरु केले. छावणी ऐवजी लावणी सुरु केली अशा निष्क्रिय सरकारचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र निषेध करीत असल्याचे पत्रकात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गिय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांचा सन्मान करीत तसेच भावी पिढीला व्यसनांपासून रोखण्यासाठी महाराष्ट्रात डान्सबार बंद केले. त्याविरुध्द डान्सबार चालक, मालकांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा तत्कालीन सरकारच्या वतीने आर. आर. पाटील यांनी उच्च न्यायालयात सक्षमपणे प्रतिवाद केला होता. म्हणून उच्च न्यायालयाने देखील डान्सबारवरील बंदी कायम ठेवली. त्यानंतर डान्सबार चालक, मालकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. मुख्यमंत्री व गृहमंत्री पदावर विराजमान असणा-या देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूकांसाठी आर्थिक निधी गैरमार्गाने गोळा करण्याच्या उद्देशाने डान्सबार बाबत सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात डान्सबार पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली. हा महिलांचे शोषण करणारा, शेतक-यांचा सातबारा कोरा करणारा व तरुणांना व्यसनाच्या खाईत लोटणारा निर्णय आहे. या विषयांबाबत फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे प्रतिवाद करीत नाहीत तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याविषयी अध्यादेश काढू असे दिशाभूल करणारे वक्तव्य शहरात येऊन करतात. हा महिला भगिनींचा व बेरोजगारांचा अपमान आहे. कोणतेही निश्चित धोरण नसताना अचानकपणे, हुकूमशाही पध्दतीने देशातील जनतेला, संसदेला, भारतीय रिझर्व बँकेला अंधारात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सव्वाशे कोटी जनतेवर नोटा बंदी लादली. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांपासून ग्रामिण भागातील छोट्या शेतक-यांपर्यंत सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. बेरोजगार युवकांना नोकरी देऊन किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याऐवजी, दुष्काळीभागातील शेतक-यांना जनावरांसाठी चारा छावणी उभारण्यास मदत करण्याऐवजी डान्सबार सुरु करण्या-या सरकारचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला तीव्र निषेध करीत आहेत असेही वैशाली काळभोर यांनी पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे वायसीएम रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडीत;

Next Post

पुणे शहरात बनावट नोटा उटवणाऱ्याला पुणे पोलिसांनी केले जरेबंद

Next Post

पुणे शहरात बनावट नोटा उटवणाऱ्याला पुणे पोलिसांनी केले जरेबंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In