• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनावर प्रभावशाली उपचारासाठी ‘संकल्प’चे प्रतिकारशक्तीवर संशोधन; ‘आरोग्य निर्भर किट’ची निर्मिती.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/01/2022
in ठळक बातम्या, व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.च्या वतीने सुरक्षित औषधांची निर्मिती तसेच कोरोना रुग्ण आणि परिवारासाठी मदत केंद्र सुरु

पुणे, दि. ०७ :- कोरोनाकाळात आधुनिक वैद्यकीय विश्व भूतो न भविष्यति असा लढा देत आहे. डॉक्टर, नर्सेस आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अतिशय धोकादायक स्थितीत काम करावे लागत आहे. पण याच वेळी निदान उपचार आणि वापरात येणाऱ्या औषधांची निश्चिती याविषयी जगभर संभ्रमावस्था झालेली आहे. मात्र संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्च २०२० मध्ये याविषयी एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडला होता, तो म्हणजे आज सांसर्गिक आजार केवळ प्रतिकारशक्ती वर अवलंबून आहे आणि केवळ आधुनिक वैद्यक शास्त्रावर अवलंबून न राहता अंतर्गत प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटीसाठी आपण प्रयत्न करायला हवा. इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती ही केवळ आणि केवळ आपल्या नियमित आहारातून किंवा आयुर्वेदातील औषधी आहारातूनच तयार होऊ शकते. कोणत्याही केमिकलमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता नाही. ‘संकल्प’ने निष्णात आणि तज्ञ डॉक्टर्स आणि संशोधकांच्या मदतीने १३ वर्षाचा अनुभव बरोबर घेऊन गेल्या दीड वर्षामध्ये एक विश्वसनीय उपाय शोधून काढला आहे. कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसलेले ‘आहारातून औषधोपचार’ म्हणजेच मेडिकल न्यूट्रिशिअन थेरपी या पूरक आहाराची निर्मिती केली आहे. यातूनच ‘आरोग्य निर्भर’ या सुरक्षित पुरक आहार आणि सुरक्षित आर्युर्वेद याचे एकत्रिकरण आहे. ‘संकल्प’चे आरोग्य निर्भर किट मान्यताप्राप्त असून संपूर्णपणे सुरक्षीत आहे.

डॉ. कदम म्हणाले की, कोणत्याही आजारात प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे असते. प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कोणताही आजार सहसा होत नाही. आपले शरीर आजाराला बळी पडू नये यासाठी ‘विष द्रव्यांचे निर्मूलन’, ‘आहार हेच औषध’, ‘उत्साह हेच जीवनाचे रहस्य’, ‘नैसर्गिक प्रतिकारशक्तीत वाढ’ ही चतुःसूत्री पाळल्यास तुम्ही आजाराला बळी पडण्याची शक्यता कमी असेल आणि बरे होण्याचा कालावधी देखील कमी असतो. मॉडर्न मेडिसिनमध्ये शरीरातील विषद्रव्य काढून टाकण्याची व्यवस्था नाही, मात्र अवयव काढण्याची व्यवस्था आहे. हे लक्षात घेऊन विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदाची मदत घ्यावी लागते. “आपली रोगप्रतिकारशक्ती ही जेनेटिक आणि नैसर्गिक देण आहे. ‘आहार- विहार आणि विचार’ हे तिन्ही घटक यासाठी महत्त्वाचे आहेत. केवळ भीतीमुळे प्रतिकार शक्तीवर परिणाम होऊन गेल्या वर्षी अनेक मृत्यू झाले. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा फारसा विचार न करता क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम हिलिंगचा वापर करून तयार केलेले ‘आरोग्य निर्भर किट’ ही एकविसाव्या शतकातील रोगप्रतिकारक शक्ती तयार करणारा जगमान्य औषधी आहार होईल.” घरी विलगीकरणात असलेले ९० टक्के रुग्ण ‘आरोग्य निर्भर किटद्वारे बरे होऊ शकत असल्याचा दावा डॉ. कदम यांनी केला आहे. तसेच कोरोना आणि इतर आजारांची गुंतागुंत याद्वारे टळू शकते. मात्र ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर आजार पूर्वीपासून असतील तर त्यांना रुग्णालयात दाखल करुन ‘आरोग्य निर्भरद्वारे’ प्राण वाचू शकतो.

डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या की, गेली २४ वर्षे अखंड ध्यास घेऊन ‘सक्षम प्रतिकारशक्ती आणि आहार’ या विषयावर सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. पी. एन. कदम यांनी केलेले संशोधन येणाऱ्या काळात खर्‍या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रातील संभ्रम दूर करुन सर्वांना दिलासा देणारे सिद्ध झाले आहे. कोरोना-कोविडपासून कोणत्याही विषाणूंना प्रतिकार करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरात एक सक्षम सुरक्षाकवच आहेच. शिवाय पांढऱ्या पेशी, टी सेल्स आणि ‘इम्यूनोग्लोब्युलिन नावाचे विशिष्ट प्रोटीन ही आपली फौज आहे. औषध रसायनशास्त्र (Pharmocology) कितीही कुठे गेलं असलं तरी आजही जगाच्या पाठीवर प्रतिकारशक्ती वाढवणारे एकही औषध तयार होऊ शकले नाही. मात्र ‘आरोग्य निर्भर’ किटद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीला आवश्‍यक असणारी ऊर्जा तयार करणारी पोषणमूल्ये आणि मुख्यत: शरीरातील इम्युनो ग्लोब्युलीन आणि पांढऱ्या पेशी यांची व्यवस्थित वाढ होते. शरीरातील फ्री रॅडिकल्स म्हणजे विषद्रव्ये यांना नियंत्रित करणे आणि अ‍ॅंटीऑक्सिडंचा सहाय्याने पेशींचे पुनरुज्जीवन करणे यासाठीचा हा शास्त्रशुद्ध आहार आहे.

संकल्पच्या रिसर्च हेड शर्वरी डोंबे म्हणाल्या की, आयुर्वेद आणि नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन ‘आरोग्य निर्भर’ची उत्पादने बनविण्यात आली आहेत. जनसामान्यांना परवडेल असे प्रतिदिन केवळ २४ रुपयांमध्ये ‘आरोग्य निर्भर बेसिक किट’ आहे. ज्यांना घरी थांबता येणे शक्य नाही आणि बाहेर जागोजागी कोरोनाचा धोका आहे अशा वेळी प्रतिदिन ४८ रुपयांमध्ये ‘आरोग्य निर्भर १.०’ जवळजवळ ९० ते ९५ टक्के सुरक्षा प्रदान करतो. यामुळे कोरोना कोविड होणारच नाही असे नाही पण आपली प्रतिकार शक्ती चांगली राहिल्यामुळे धोक्याची स्थिती असणार नाही. याशिवाय दुर्दैवाने कोविडची व इतर कोणत्याही विषाणूंची लागण झालीच तर “आरोग्य निर्भर २.०” हा परिपूर्ण इम्युनिटी आणि एनर्जी बुस्टर असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

पर्यटन उद्योगाला गती….

Next Post

..पुणे विद्यापीठ आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत नगर च्या मुलांची सरशी……… नाशिक च्या मुलीची चमकदार कामगिरी विजयी

Next Post

..पुणे विद्यापीठ आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत नगर च्या मुलांची सरशी……… नाशिक च्या मुलीची चमकदार कामगिरी विजयी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist