पुणे,दि.०४ :- महापालिकेची सार्वत्रिक आगामी निवडणूक कधी होणार, याबाबतचा संभ्रम आज (बुधवारी) दूर झाला. ओबीसी आरक्षणाशिवाय आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक विभागाची जोरदार तयारी सुरु आहे. ईव्हीएम मशीनची दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादी विभाजान, आरओ ऑफिसची ठिकाणे निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक विभागाची लगबग सुरु आहे. अंतिम प्रभाग रचना, एसी, एसटीचे आरक्षण सोडत, महिला व पुरुष ड्रॉ काढण्याचे काम बाकी आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली. 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग केला. त्यातून 139 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यानुसार तयार केलेला प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला. या प्रभाग रचनेवर हरकती मागवून त्यावर सुनावणीही घेतली. सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगालाही पाठविला. प्रभागरचना अंतिम होणे शिल्लक आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर निवडणुकांचे अधिकार राज्याने विशेष कायदा पारित करत स्वतःकडे घेतले. त्यानंतर राज्यातल्या विविध महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक जाहीर होईल.
त्यादृष्टीकोनातून निवडणूक विभागाचे काम सुरु आहे. मतदान यंत्रे (‘ईव्हीएम’) दुरुस्तीचे काम सुरु आहे. महापालिकेकडूनही प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम सुरु आहे. त्याला आता वेग येईल. प्रभाग रचना अंतिम, आरक्षण सोडतीचे काम बाकी आहे. या सर्व प्रक्रियेला 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागेल. न्यायालयानेही 15 दिवसांतच निवडणूक जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे 19 मे रोजी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिका निवडणूक विभाग सज्ज आहे.
महापालिकेने प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी आयोगाला पाठविला आहे. प्रभागनिहाय मतदार यादी विभाजानाचे काम सुरु आहे. ईव्हीएम मशीनची माहिती दिली आहे. आरओ ऑफिसची ठिकाणे निश्चित केली आहेत. निवडणूक विभागाची पूर्णपणे तयारी आहे. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाचे जे निर्देश येतील. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.