पुणे शहरातील कर्वेनगर येथे प्रदेश तेली महासंघाची जिल्हा, तालुका, व पुणे शहर कार्यकर्ता बैठक झाली. ही बैठक कर्वेनगर येथील श्री. संताजी सभागृह येथे पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोषशेठ माकुडे, तर प्रमुख पाहुणे सौ. प्रियाताई महिंद्रे, म्हणून महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुडे, उपाध्यक्ष. विजयभाऊ रत्नपारखी, युवा उपाध्यक्ष. सागर व्हावळ, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ. नीलमताई घाटकर, पश्चिम महाराष्ट्रच्या अध्यक्ष निशाताई करपे, जिल्हा अध्यक्ष सौ. उज्ज्वलाताई पिंगळे उपस्थित होत्या.
.पुणे शहर अध्यक्ष सुरेंद्र दळवी यांनी आलेल्या तेली समाजबांधवांचे स्वागत केले. महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष. रमेश भोज या बैठकीत महासंघाच्या ध्येय धोरणांवर तसेच भविष्यात राबविण्यात येणार्या योजनांबद्दल उपस्थित समाजबांधवांना माहिती दिली.
या बैठकीत जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील सुमारे १०० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या व नियुक्तीपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष. दिलीप शिंदे यांनी केले. तर पश्चिम महाराष्ट्र सचिव. गणेश पिंगळे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था चोख बजावली.
सदर बैठकीसाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सचिव सुवर्णाताई भगत, सौ. उषाताई केदारी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. रमेशशेठ भोज, कार्याध्यक्ष, प्रदीपशेठ क्षीरसागर, सचिव. संजय चौधरी, उपाध्यक्ष. संजय भगत, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ. उज्ज्वलाताई पिंगळे, सचिव सोनाली चौधरी, पुणे शहर अध्यक्ष. सुरेंद्र दळवी, कार्याध्यक्ष. राजेंद्र दळवी, सचिव. विजय क्षीरसागर, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिंदे, सौ. राजेश्वरी चिंचकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले….. धनंजय वाठारकर यांचे विशेष सहकार्य लाभले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष. संजय भगत यांन उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले.