पुणे,दि.०४ :- श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड संस्थेच्या झालेल्या वार्षिक बैठकीत सर्वसाधारण सभा रविवार दि.०३ जुलै २०२२ रोजी पार पडली. या सभेत च्या त्रैवर्षासाठी नवीन कार्यकारिणी समितीची निवड जाहीर करण्यात आली.
दिलीप शिंदे यांची कार्याध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी राजेंद्र किरवे यांची, तर चंद्रकांत जगनाडे व रामचंद्र कटके यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड या संस्थेची वार्षिक बैठकीत नुकतीच संपन्न झाली. सदर बैठकीत सर्वानुमते या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी, संस्थेच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
संस्थेच्या भविष्यात राबविण्यात येणार्या योजनांसाठी सर्वानुमते कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आला आहे. संस्थेचे खजिनदार सूर्यकांत मेढेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.