श्रीगोंदा,दि.१३ :–चोरी, दरोडा, खून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे दोन सराईत गुन्हेगार तसेच कर्जत पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेले आरोपी निमिशा कुंडलिक भोसले वय ४५ वर्षे, रा. थेरगाव फाटा ता. कर्जत, नितिन उर्फ निशान भगवान उर्फ भानुदास भोसले वय ३५ वर्ष औरंगाबाद यांच्या श्रीगोंदा पोलिसांनी दि.१३ ऑक्टोबर रोजी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळून गजाआड केले.तसेच दोन्ही आरोपींना कर्जत पोलिसांच्या स्वाधीन केले.
दि.१३ ऑक्टोबर रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना माहिती मिळाली कि, थेरगाव फाटा ता. कर्जत येथे गुन्हेगार वस्तीवर येणार असल्याची माहीती मिळाली होती.
या माहिती नुसार थेरगाव फाटा ता. कर्जत येथील गुन्हेगार वस्तीवर कोबिग ऑपरेशन करण्यास सांगितले होते. दि.१३ ऑक्टोबर रोजी २ ते ८ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले असता २ संशयित ईसम मिळुन आले असता त्यांना ताब्यात घेवुन त्यांची नावे विचारली असता त्यांची नावे निमिशा कुंडलिक भोसले वय ४५ वर्षे, रा. थेरगाव फाटा ता. कर्जत,नितिन उर्फ निशान भगवान उर्फ भानुदास भोसले वय ३५ वर्ष औरंगाबाद अशी त्यांची नावे असुन,त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांचे विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असुन ते गुन्हा घडल्यापासुन फरार होते.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई समीर अभंग, सफौ अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे,पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ रविंद्र जाधव यांनी केली आहे.