पुणे,दि.२३:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट च्या निवडणुकीत १० पैकी ९ जागा जिंकून विद्यापीठ विकास मंच ने दणदणीत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ह्या निवडणुकीत आपले पॅनल उतरविले होते. अनेक ठिकाणी निवडणूक कार्यालयांचे उदघाट्न करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयाच्या वलग्ना केल्या होत्या. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही निवडणुकीत सोत्हा लक्ष घातले होते. मात्र त्यांच्या पॅनल चा दारुण पराभव हा पुणे मनपा निवडणुकीत भाजपा ला मिळणाऱ्या यशाची नांदी असून महाविकास आघाडीने मतदारांचा कौल लक्षात घ्यावा अशी प्रतिक्रिया भाजपा चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेले यश, भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. धनंजय महाडिक यांनी मिळविलेले यश आणि आता पुणे विद्यापीठ सिनेट च्या निवडणुकीत मिळालेले यश हे आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे निदर्शक असून यातून बोध घेऊन राष्ट्रवादी च्या पुण्यातील नेत्यांनी अश्लाघ्य टीका करायचे थांबवावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना येणाऱ्या काळात पुणे विद्यापीठ अधिक प्रगती करेल व
पारदर्शी कारभाराचा आदर्श निर्माण करेल असा विश्वास ही खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.व सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना येणाऱ्या काळात पुणे विद्यापीठ अधिक प्रगती करेल व पारदर्शी कारभाराचा आदर्श निर्माण करेल असा विश्वास ही. खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.