पुणे,दि.०७:- पुण्यात काही पोलीस स्टेशन अंतर्गत चालणारे अवैध धंदे व मटका अड्ड्यावर काही दिवसांपूर्वी कारवाईचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी बडगा उगारला होता. व त्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण पुणे शहरातील अवैद्य धंदे बंद केले होते व त्यांच्या बदली झाल्यानंतर काही दिवसातच पुण्यातील काही पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे अवैध्य धंदे परत सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे एक उदाहरण पुणे शिवाजीनगर परिसरातील सुरु असलेल्या अवैध ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली १ आंकी आकडेवार कोणतीही शासनाची परवानगी नसणारी लॉटरी दुकानात छापा पोलिसांनी एकाचवेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापे टाकून सुमारे 4 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 55 जणांवर कारवाई केली. ही कारवाई केली होती व अवैध ऑनलाईन जुगार धंद्या बाबत मिळालेल्या बातमीनुसार, शिवाजीनगर हद्दीमध्ये पुणे, शिवाजी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील, रामसर बेकरी कॉर्नर शेजारच्या अनुक्रमे स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरी घ्या नाव खाली व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैर कायदेशीररीत्या खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार बनावट ग्राहक व पोलीस पथकासह काही दिवसांपूर्वी छापा टाकून मोबाईल व संगणकाचा वापर करुन ऑनलाईन मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकुण 55 इसमांविरुद्ध आयपीसी 420, सह कलम 120 (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ) व 5 तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 66 (सी) व (डी) अन्वये शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते.
शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपट गृहासमोरील चौकात (पुणे महापालिका चौकात) रामसर बेकरी ते आलोक रेस्टॉरंट ॲंड बारचे दरम्यान असलेल्या व सध्या बंद पडलेल्या सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीतील एकुण सहा गाळ्यात स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने सदरचा ऑनलाईन लॉटरीचे नावाखाली हे ऑनलाइन लॉटरी व झटपट निघणारी पणती पाकोळी, अंदर बाहार, जुगार व लॉटरी अड्डे सुरू करण्यात आलेले होते. सदर जुगाराचे अड्डे बाहेरुन बघीतले तर सर्व साधारण माणसाला ओळखू न येणारे असे आहेत.या जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर जाड कापडाचे गडद रंगाचे मळके पडदे लावलेले असून, त्यामुळे आत लाईट सुरू असला अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. या जुगार अड्ड्याच्या दुकानाबाहेर व आसपास या जुगार अड्ड्यावरचे शुटर्स (इंन्फॉर्मर्स) बसलेले असतात. ते बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत आतल्या व्यक्तीस मोबाईल वरून माहिती पुरवत असत. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व जुगारींना मागच्या दाराने पळवून लावून, शेजारच्या दुकानातून दिलेला विद्युत पुरवठा खंडित केला जातो. बाहेरच्या रस्त्यावर सतत प्रचंड वाहतूक असल्याने या जुगार अड्ड्याकडे खेळणारे सोडले तर इतरांचे सहसा लक्ष जात नाही.
याठिकाणी ऑनलाईन ॲपद्वारे व पांढऱ्या प्लास्टिक पेपर शीटवर जुगार खेळण्यात येतो. खेळींनी लावलेला आकडा एका पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक पेपरवर लिहला जातो. तो नंबर लक्षात ठेवण्यासाठी खेळी हा त्याचा मोबाईल मध्ये फोटो काढून घेतो. व काही क्षणातच या जुगाराचा ऑनलाईन निकाल लागतो. या ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज, ॲपचा मालक व चालक यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न वापरता संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची देखील फसवणूक केली असल्याचे निदर्शनास पोलिसांच्या आले होते व गुन्हाही दाखल झाला होता व काही दिवसांतच परत जैसे थे तैसे पुण्यात काही पोलीस स्टेशन अंतरहद्दीतीत अवैध धंदे चालू झालेलं चित्र परत पाहण्यास मिळत आहे