पिंपरी,दि.०७ : -पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील पिंपळे सौदागर येथील एवन स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश करत एका महिलेची सुटका केली, तर स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.०७) मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली.मॅनेजर दत्तात्रय सुकवंत पवार (वय 34, रा. हंगरगा, ता. निलंगा), स्पा सेंटरचा मालकदेवीदास सुभाष दहिफळे (वय 33, रा. पाथर्डी रोड, चिंचपूर इजादे, अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करून दत्तात्रय पवार याला अटक केली आहे. याबाबत अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष पिंपरी चिचंवड पोलीस नाईक गणेश सीताराम कारोटे (वय 36) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपळे सौदागर येथील साई अॅम्बियन्स सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एवन स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून स्पा सेंटरवर रात्री दीडच्या सुमारास छापा टाकला.आरोपीन पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करून महिलेची सुटका केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.