पुणे,दि.०७:- प्रतिनिधी – किरकोळ कारणावरून झालेली भांडणे सोडविण्यास गेलेल्या भावाला कुऱ्हाडीने सपासप वार व लाकडी दंडक्याने जबर मारहाण झाल्याची घटना कोंढव्यात येथे घडली आहे. याप्रकरणी जैद बागवान, अवेज बागवान (वय 35), ईश्तीक बागवान (वय 33, रा. ब्रम्हा मॅजिस्टीक सोसायटी, कोंढवा) याच्यासह अज्ञात दहा ते बारा जणाविरुद्ध कोंढवा पोलिस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.जैनुद्दीन सलाकउद्दीन शेख, (वय 22 वर्षे रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांनी दिलेल्या फिर्यादिवरून त्यांना त्याचा पंधरा वर्षाच्या आतेभावाने फोन करून काहीजण त्याला मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे घटनास्थळी काही लोक आतेभावाला बेदम मारहाण करत असल्याने ते सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनादेखील लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर मारत तसेच लाकडी दंडक्याने खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. तसेच मध्यस्थी आलेल्या रिक्षाचालक मोहसीन पटेल यालादेखील आरोपीनी मारहाण केली. यामध्ये मोहसीन यांच्या डोक्याला १५ टाके पडले असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जमलेल्या इतर लोकांनादेखील मारहाण करण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे