पुणे,दि.११:- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच गृह विभागाकडून राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमध्ये ७ पोलीस निरीक्षक पुण्यातून बाहेर गेले होते. अपर पोलीस आयुक्त प्रशासन आर. राजा यांनी परिपत्रकाद्वारे प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व बदलीचे ठिकाण
१) बालाजी अंगदराव पांढरे
गुन्हे शाखा ते वपोनि चतु:शृंगी पोलीस स्टेशन
२) महेंद्र जयवंतराव जगताप,
वपोनि कोथरुड ते विशेष शाखा
३) संदीपान वसंतराव पवार
विशेष शाखा ते वपोनि डेक्कन पोलीस स्टेशन
४) हेमंत चंद्रकांत पाटील
गुन्हे शाखा ते वपोनि कोथरुड पोलीस स्टेशन
५) बाळासाहेब सदाशिव बडे
पोनि गुन्हे कोथरुड ते वाहतूक शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांना पुढील आदेश होई पर्यंत नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.