पिंपरी चिंचवड,दि.१३:- पिंपरी चिंचवड परिसरात मंत्री व भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी आले असताना यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.व पोलीस संरक्षणात असतानाही शाईफेकीचा प्रकार घडल्याने 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यात तीन अधिकारी आणि आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. व
मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. या तीघांवर 307 कलम (जीवे मारण्याचा प्रयत्न करणे) लावण्यात आलं होतं.
यांच्यावरील शाईफेकीवेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या 11 पोलीस व अधिकारी-कर्मचांवर राज्य शासनाने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाई संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश दरम्यान, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. व 11 पोलिसांचं निलंबन मागे घेण्याचे आदेश देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत.