पुणे,दि.२४ :- पुण्यातील बेल्हे गाव, ता. जुन्नर, परिसरातील फिर्यादी सदाशिव बोरचटे यांच्या राहत्या घरामध्ये पाच ते सहा जणांनी दरोडा टाकला होता व कोयता व पिस्टलचा धाक दाखवून तब्बल २८ लाख ५० हजारचा मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन कडून टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग. मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग मंदार जावळे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक. प्रमोद क्षिरसागर,बेल्हे गाव येथे घटना घडल्या नंतर खंडणी विरोधी पथक मधील अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळावरील पडताळणी केली. गोपनीय बातमीदारामार्फत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हे नाशिक व मध्यप्रदेश येथे एकाचवेळी छापेमारी करून वासिंद ठाणे ग्रामीण येथून इसम नामे १) इर्शाद नईम शेख, वय २८ वर्षे, रा. रो हाऊस नं. ७, संजेरी बो-हाडेमळा, पंचक जेल रोड, नाशिक रोड, नाशिक व त्याचे वडील २) नईम चांद शेख, वय ५२ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेतले व मध्यप्रदेश येथून ३) मोहम्मद हनीफ अल्ला बंदखान, वय ६२ वर्षे, रा. १०८, पटेलनगर, खाजराणा इंदोर, ४) शुभम रामेश्वर मालवीय, वय २४ वर्षे, रा. गादेशहा पिपालिया, ता. जि. देवास, ५) रहमान फजल शेख, वय ३४ वर्षे, रा. फलॅट नं. १, पंचम अॅव्हेन्यू, जेल रोड, राजेश्वरी मंगल कार्यालय, नाशिक, ६) लखन बाबुलाल कुंडलिया, वय ३० वर्षे, रा. देवास रसलपूर, ता. जि. देवास यांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचेकडून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर अशा दोन गाडया जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन येथे चालु आहे. अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील सदस्यांवर यापूर्वीचे दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकुण (२०) गुन्हे दाखल आहेत. याच टोळीने दिंडोरी येथे एका कंपनीत २ गुन्हे केले असल्याची माहिती सांगत आहेत त्याबाबत अधिक तपास चालू आहे. नमुद गुन्हयातील आरोपींनी गुन्हयातील दरोडा टाकून चोरलेले सोन्याची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर कामगिरी
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग मितेश घट्टे,उप विभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग मंदार जावळे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक. प्रमोद क्षिरसागर, आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. सचिन काळे, स.पो.नि. नेताजी गंधारे, पो.स. ई. गणेश जगदाळे, सहा. फौज. तुषार पंदारे, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा.राजू मोमीन, पो. हवा. विक्रमसिंह तापकीर, पो. हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. सचिन घाडगे, पो.हवा. योगेश नागरगोजे, पो.हवा. चंद्रकांत जाधव, पो.ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. निलेश सुपेकर, पो.कॉ. अक्षय सुपे, चा. सहा. फौज. मुकुंद कदम, चा. पो. हवा.प्रमोद नवले, आळेफाटा पो.स्टे. येथील स.पो.नि.श्री. बडगुजर, पो. हवा. गायकवाड, पो. कॉ. पारखी, पो.कॉ. मालुंजे, पो.कॉ. ढोबळे यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे