पुणे,दि.३०:- गोवा मार्ग मद्यसाठा पुण्यात आलेल्या नवले ब्रीज व तळेगाव दाभाडे या ठिकाणी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २ हजार दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या मद्याची किंमत १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हि कारवाई पुण्यात करण्यात आली. या कारवाईत पकडलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
दोन ट्रकमधून ही दारू गोव्यातून पुण्यासह इतर राज्यांत जात असताना ही कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे मद्य बनावट आहे. गोवा राज्यातून हा माल आल्याचे समोर आले आहे. पण कुठे जात होता याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.
चरणसिंग रजपूत (पोलिस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग)