पिंपरी चिंचवड,दि.२१:-महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीती किरकोळ वादातून मित्राचा खुन केला गेला होता व आंधबोरी, ता-किनवट, जि-नांदेड एक ३५ वर्षीय इसमाचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन केलेल्या अवस्थेतील प्रेत मिळुन आले. पिंपरी-चिंचवड महाळुंगे पोलीस चौकी च्या पोलीस पथकाने कोणताही सुगावा नसताना अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून ४ तासाच्या आत आरोपीला गजाआड केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनाची घटना गुरुवारी (दि. 19) रात्री पावणे बारा वाजता महाळुंगे-आंबेठाण रोडवर एका किराणा दुकानासमोर महाळुंगे येथे घडली.असून मयत नाव दिपक काशिराम राठोड, वय अंदाजे ३५ वर्ष रा-वाशिम असे खून झालेल्या नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल मंगेश चव्हाण वय २२ वर्ष, मुळगाव आंधबोरी, ता-किनवट, जि-नांदेड यास पोलिसांनी पुण्यातील महाळुंगे पोलीस चौकी परिसरातून अटक केली पोलीस शिपाई बाळकृष्ण पाटोळे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत हे म्हाळुंगे येथे एकत्र रुमवर रहात होते. गुरुवारी रात्री दोघांनी दारु पिली व ते दोघे जेवणासाठी चायनीज सेंटवर गेले. तिथे दोघात किरकोळ कारणावरून वाद झाले. ज्यामध्ये आरोपीने दीपक याला खाली पाडून रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला.
खूनानंतर पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. तिथे आसपासाच्या नागरिकांची चौकशी केल्यानंतर मयताची ओळख पटली. दरम्यार आरोपी हा त्याच्या मूळगावी म्हणजे नांदेडला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केली असता त्याला 24 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पाटील करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- १ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्रीमती प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस अंमलदार राजु राठोड, विठ्ठल वडेकर, प्रशांत ठोंबरे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे, सचिन माने, भाग्यश्री जमदाडे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत.