पुणे,दि.२२:- रेंजहिल्स खडकी, पुणे याचे दि. 19 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घराचे कुलुप लावुन बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप व कोयंडा तोडुन घरफोडी करुन घरातील फ्रिज, टीव्ही. लॅपटॉप व घरसामान घर फोडी करून सदर ऐवज चोरून नेला होता याबाबतची तक्रार खडकी शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर, आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, तपासपथकाचे पोउप निरीक्षक वैभव मगदुम, परिविक्षाधिन पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, सपोफौ कांबळे, पो.ना. कलंदर, पो.ना. निकाळजे, पो.शि. दिघे, पो.शि. पठाण यांनी दाखल गुन्ह्यातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात आरोपीतांचा १२ तासाच्या आत शोध घेवून यातील विधीसंघर्षग्रस्त बालक निष्पन्न करुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला ८८ हजार रु. किंमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास संतोष भांडवलकर, परिविक्षाधिन पोलीस उप निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.