पिंपरी चिंचवड,दि.२३:- पुण्यातील सुसगाव येथे घरफोडी करून गुजरात मध्ये पुण्यातून चोरीचा माल विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७० तोळे सोने व ८ लाख रोख ऐवज जप्त केले आहे.
अजय सर्जा नानावत (वय २७ रा.मुळशी) कन्हैया विजय राठोड (वय १९ रा. मावळ), आशा राजूभाई ठक्कर (रा. गुजराथ) यांना अटक केली असून अनिरुद्ध योगेश राठोड उर्फ नानावत व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट श्रीहरी चांदेरे वर ४४ रा. दत्त मंदिर शेजारी सुसगाव यांनी २५ डिसेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार २३ ते २४ डिसेंबर दरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी घरातील ११९ तोळे सोने व रोख रक्कम चोरून नेली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील ५७ पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले.
तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुसगाव घरफोडीतील संशयीत हा दुचाकीवरून बापुजी मंदीर येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने त्याचे नाव अजय सांगितले. त्याने गुन्हा कबुल केला व सांगितले की तो स्वतः दिवसा घरांची रेकी करत असे व त्याचे साथीदार कन्हैया, मोहन, अनिरुद्ध यांच्या मदतीने घरफोडी करत असे. चोरी केलेला माल आरोपी अहमदाबाद येथील आशा ठक्कर ला विकला त्याचे ठक्र हिने ८ लाख रुपये बँक खात्यात जमा केले.
पोलिसांनी तपास तेथेच न थांबवता हिंजवडी पोलिसांची एक टीम गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथे जाऊन सलग १५ दिवस राहिली. ठक्कर ही पुण्यात येणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी तीलाही पुण्यातून ताब्यात घेतले. तिच्याकडून पोलिसांनी तपासात ६६ तोळे सोने जप्त केले. पोलिसांनी या तपासात अजय कडून ४ तोळे सोने व ८ लाख रुपये व ठक्कर कडून ६६ तोळे सोन असे एकूण ७० तोळे सोने व ८ लाख रुपये ऐवज जप्त केला.
या तपासात पोलिसांनी तीन घरफोडी उघडकीस आणल्या. आरोपी अजय नानावत याच्यावर यापुर्वीही एकूण ३२ गुन्हे दाखल असल्याचे तर ठक्कर वर ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
ही कारवाई सदरची कारवाई. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, पोलीस सह आयुक्त, डॉ. श्री. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ.विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक अजीत काकडे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, सुभाष गुरव, सोनाली ढोणे, श्रुती सोनावणे, शालीनी वचकल यांनी केली आहे.