बारामती,दि२४:- भाजप कार्यालय येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ अर्चना पाटील बोलत होत्या त्या म्हणाल्या की केवळ धार्मिक रूढी परंपरा जपायची म्हणून हे हळदी कुंकू नाही तर त्यानिमित्ताने आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कलानुसार दिसते तसेच वैचारिक / बौद्धिक देवाण घेवाण होते म्हणून हा सण आपण साजरा करतो. हळदी कुंकू हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे, कुंकुम तिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुध्दी पूजेचे अधिष्ठान आहे,
यावेळी तालुका अध्यक्षा अंजली खजिनदार, सारिका लोंढे, लक्ष्मी मोरे, सुनीता झेंडे, स्वाती कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा युवती उपाध्यक्ष साक्षी काळे इत्यादी उपस्थित होते.