पुणे,दि.३० :- पुणे शहर परिसरातील विश्रामबाग परिसरात बेकायदेशीरपणे एका बंद खोलीत बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार काही इसम पत्त्यांवर जुगार खेळत व खेळवत असलेल्या पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा.
या कारवाईत पोलिसांनी १२ जणांनान ताब्यात घेऊन १ लाख २४ हजार ८७० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार (दि.२९) रोजी केली आहे.विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे एका बंद खोलीत बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार खेळत व खेळवत असलेबाबत
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता,काही इसम बेकायदेशीर पत्त्याचा जुगार पैशांवर खेळत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी १० इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील रोखर क्कम २४ हजार ८७० रूपये. व ०८ मोबाईल अंदाजे रक्कम १ लाख रुपये व १० जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख २४ हजार ८७० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १० जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या १० जणांना पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई सदरची कारवाई. पुणे शहर पोलीस आयुक्त, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, अजय राणे, अण्णा माने, तुषार भिवरकर, संदिप कोळगे या पथकाने यशस्वी केली आहे.