पुणे,दि.३०:- प्रतिनिधी –प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य )पुणे जिल्हा व पुणे शहराच्या प्रसिद्धीप्रमुख पदी संतोष राम काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, विजय चौधरी यांच्या हस्ते पुण्यात प्रदेश तेली महासंघ च्या कार्यकर्ते मेळाव्यात पुणे येथे त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना प्रदेश तेली महासंघच्या ध्येय धोरणांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणार असल्याचे घरत यांनी सांगितले.जयदत्त (अण्णा) शिरसागर यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने तसेच संतोष माकोडे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र. दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र. गणेश पिंगळे, सचिव पश्चिम महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार ‘संतोष काळे’ यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन, पुणे शहर, पुणे जिल्हा “प्रसिद्धी प्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे.