पुणे,दि.३१:- पुणे शहरातील कोयता गँगमधील अल्पवयीन मुले पुणे पोलिसांनी टोळक्याला पकडले होते. त्यांची रवानगी येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृहामध्ये केली होती. त्यातील सात अल्पवयीन मुलांनी भर दिवसा संस्थेच्या सरंक्षण भितीला शिडी लावून त्यावरुन पसार झाली आहे.
याप्रकरणी काळजीवाहक संतोष किसन कुंभार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.
पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांत पकडलेल्या विधी संघर्षीत मुलांना ठेवले जाते. बाल न्यायालय मंडळाच्या आदेशानुसार सौरभ वायदंडे यालाही निरीक्षणगृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या मुलांना वेगवेगळ्या सत्रांकरीता बाहेर काढले जाते. त्यावेळी या १६ -१७ वर्षाच्या ७ मुलांनी तेथील शिडी घेऊन ती भिंतीला लावली. त्यावरुन चढून जाऊन ते पळून गेले आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे अधिक तपास करीत आहेत.
कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एका सराइताविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राचे निरीक्षण गृह आहे.
गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते.