पुणे,दि.३१:- प्रतिनिधी –प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य )पुणे शहर युवती अध्यक्ष प्रमुख पदी कु. प्रियांका प्रताप खोंड, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, विजय चौधरी यांच्या हस्ते पुण्यात प्रदेश तेली महासंघ च्या कार्यकर्ते मेळाव्यात पुणे येथे त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना प्रदेश तेली महासंघच्या ध्येय धोरणांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणार असल्याचे यांनी सांगितले.जयदत्त (अण्णा) शिरसागरयांसच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने तसेच सौ.संध्या सव्वालाखे, अध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य. सौ.प्रिया महिंद्रे, प्रभारी महिला आघाडी महाराष्ट्र राज्य. ऐश्वर्या भगत, अध्यक्ष युवती आघाडी महाराष्ट्र राज्य. संतोष माकोडे,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र. दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र. गणेश पिंगळे, सचिव पश्चिम महाराष्ट्र व रमेश भोज, यांच्या सूचनेनुसार ‘कु. प्रियांका खोंड ’ यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन, पुणे शहर युवती” पदी निवड करण्यात आली आहे.