पुणे ग्रामीण दि १२ :- पुणे दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन स्टेशन हद्दीत मौजे डाळिंब येथे नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी करत आहेत आणि त्यावरून वादविवाद होत आहेत अशा तक्रारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, यांना प्राप्त झाल्या होत्या. व गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीस जवान आणि यवत पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि पोलीस जवान यांचेसह अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपी हे बेकायदेशीररीत्या जे. सी. बी. मशिनचे साहाय्याने वाळू उपसा करत असताना पोलिसांना मिळून आले. वाळू उपसा करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.१) १५,००,०००/- रू किंमतीचा एक पिवळया रंगाचा जे सी बी नं. एम.एच.४२ ए.एस.
२०२९ जु वा किं अ.
२) ८,००,०००/- रू किंमतीचा ट्रक न एम. एच. १२. एफ. होड ४६८५ त्यामध्ये अंदाजे ४ ब्रास मातीमिश्रीत वाळु जु. वा. कि. अं. ३) ८,००,०००/- रू किंमतीचा ट्रक नं एम. एच. १२. एफ. झेड. ६१७४ त्यामध्ये अंदाजे ४ ब्रास माती मिश्रीत वाळु जु. वा. कि. अं.
३१,००,००० /- एकुण मुद्देमाल जप्त करून यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१४६/२०२३ भा.द.वि.क ३७९,१२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपी १) सत्यवान गोवर्धन पाटोळे रा. कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे २). गोकुळ जालिंदर शिंदे रा. नागयगाव ता.हवेली जि. पुणे ३). आलम सुलेमान अन्सारी रा. डाळिंब ता.हवेली जि.पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे. जमिन मालक व वाहण मालक यांना अटक आरोपी व साथीने सदर गुन्हाचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याने जमिन मालक नामे म्हस्के रा. डाळिंब व या सर्व प्रकाराचा मुख्य सुत्रधार किरण सावकार म्हस्के रा. डाळिंब तसेच जे.सी.बी. मालक रविंद्र लक्ष्मण म्हस्के व वाहण मालक संदीप बळीराम बारस्कर रा. कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे यांना आरोपी करण्यात आलेले आहे. अंदाजे ५० ब्रास मातीमिश्रीत वाळु साठा मिळुन आलेला असुन सदरची वाहणे व मातीमिश्रीत वाळु साठा मंडल अधिकारी यवत, भानुदास हरिभाऊ येडे यांचे ताब्यात देवुन महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम कलम ४८ (७) (८) प्रमाणे पुढील कारवाई करणे करणेबाबत मा. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी दौंड यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोहवा. संदीप देवकर, पो. हवा. मेघराज जगताप, पो.हवा. रविंद्र गोसावी, पो.ना. दत्ता काळे व चालक पो.ना.. विजय आवाळे यांचे पथकाने केली आहे.