पुणे ग्रामीण, ता. १३: पुणे मुंबई महामार्गावर नियमांना बगल देत पहाटेपर्यंत ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याचे दिसत आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व अनधिकृतपणे राजरोसपणे बारवर काही वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून बंद केले होते; तर परत पुणे मुंबई महामार्गावर मात्र बारमध्ये चालणाऱ्या अनेक गैरप्रकारांवर पोलिस कानाडोळा करत आहे. पुण्याकडून मुंबई जाणाऱ्या महामार्गावर काही दिवसांपूर्वी बार सुरू झाले आहेत. पहाटे पर्यंत गाणी आणि नृत्याचा ठेका, तसेच ऑर्केस्ट्रा बार मध्ये मुलींवर लाखो रुपये उडवले जात आहे. विशेष म्हणजे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डझनभर पुरावे देऊनही पोलिस मात्र त्या पुराव्यांना दफ्तरी बंदिस्त ठेऊन बारमालकांना अभय देत असल्याने छमछम झिंगाट हा वाढतच चालला आहे. बारचालकांकडून नियमांचे पालन केले जात नसून अनेकदा पोलिस नियमांवर बोट ठेवून कारवाई करतात; परंतु नियमानुसार चालणाऱ्या बारपेक्षा नियमबाह्य वेळेतील बारवर पोलिस सहसा धजावत नाहीत. त्यामुळे बारविरोधात व दोन नंबर धंद्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई मोहीम थंडगार पडली आहे की काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
रात्री १०.०० वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम परवानगी दिली जाते तर पहाटे पर्यंत सर्रासऑर्केस्ट्रा बार हे सुरू असल्याचे चित्र पुणे ग्रामीण मध्ये काही ठिकाणी दिसुन येते आहे.