पुणे,दि.१९ :- खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील रेजहील्स परिसरात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरणार्याला खडकी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.जसराज उर्फ चंक्या वासुदेवन मंन्नु (23, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. २७ जानेवारी रोजी रेंजहील्स येथे असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली होती. घटनेनंतर खडकी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. दरम्यान येथील एका गॅरेजमध्ये काम करणारा जसराज हा घटना घडल्यापासून गायब झाला होता. त्यामुळे त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. तेव्हापासून खडकी पोलीस जसराजच्या शोधात होते. या दरम्यान जसराज हा रेजहील्स भागात आल्याची गोपनीय माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून जसराज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर, आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, तपासपथकाचे पोउप निरीक्षक वैभव मगदुम, सपोफौ तानाजी कांबळे, पो.ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो.शि. पठाण यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वैभव मगदुम, पोलीस उप निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.