पिंपरी चिंचवड,दि.१९:- स्पा सेंटरच्या नावाखाली पिंपळे सौदागर येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायाला पोलिसांच्या दणका पाच महिलांची अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने कारवाई करून या महिलांची सुटका करत स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली.ही कारवाई बुधवारी सांगवी परिसरात करण्यात आली.
याप्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षातील पोलिस हवलदार सुधा अशोक टाके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरचा मॅनेजर शाकीर समीरउद्दीन अहमद (वय २६) याला अटक केली आहे. तर, पांडे चंकी धमेंद्र (वय २२, आदर्शनगर, काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संगनमत करून स्पा सेंटरच्या नावाखाली पाच पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. यातून आलेल्या पैशातून आरोपी आपली उपजीविका भागवत होेते. याविषयी माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली. तसेच स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पो.निरी.गुन्हे शाखा सुनील तांबे करीत आहेत