पुणे,दि.२७:- पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं.
कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडलं तर आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे.
कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 या वेळेत 18.50 तर 1 ते
3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. कसबा पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं.
पुण्यातील अनेक नागरिकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसला मात्र दुपारनंतर मतदान संथ गतीने सुरु होतं. सकाळी कसबा मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात सहभाग होता. सकाळी मतदानासारखं महत्वाचं काम आटपूनच दिवसाची सुरुवात करायची, अशा भावना मतदारांनी व्यक्त केली होती.