पुणे,दि.२७:- पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल मध्ये साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पबविरुद्ध पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’वर शनिवारी (दि.२४) कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी २ लाख ३० हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, व डीजे मिक्सर जप्त केले आहे
आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई केली जात आहे. कोरेगाव पार्क येथील लेन नं.7 येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’ मध्ये रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे पेट्रोलींग करत असताना पथकाच्या निदर्शनास आले.
त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले.तसेच या हॉटेलच्या मॅनेजरवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव,
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.