पुणे,दि.२५ :- पुणे शहर परिसरातील दत्तनगर कात्रज रोड परीसरात परिसरात बेकायदेशीरपणे एका ठिकाणी काही इसम पणती पाकोळी सोरट जुगार खेळत व खेळवत असलेल्या पणती पाकोळी सोरट जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ८ जणांनान ताब्यात घेऊन ६ हजार ९८० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार (दि.०३) रोजी केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे पणती पाकोळी सोरट जुगार हा अशा प्रकारे खेळला जातो बारा अंक किंवा फोटो दाखवली जातात त्या पैकी एका कोणत्याही एका फोटो ला दहा रुपये लावले तर फोटो किंवा नंबर आला तर १० रूपये मध्ये १०० रुपये मिळतात असा जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ६ हजार ९८० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ८ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या ८ जणांना पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेट पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.