पुणे दि,२३: – ज्येष्ठ पत्रकार विजयराव मारूती मोरे (वय ५८) यांचे आज पहाटे २ वाजता अल्पशा आजाराने कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
विजय मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत होते. पोलीस आणि गुन्हेगारी विश्वातील ते वार्तांकन करत होते. त्यांनी पुणे आणि मुंबई येथील अनेक दैनिकांमध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून काम केले. आज (शनिवार) पहाटे २ वाजता त्यांचे दु:खद निधन झाले. आज (२३/२/२०१९) दुपारी १२ वाजता वडगाव मावळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पोलीस वर्तुळातील अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली होती.