पुणे,दि २५ :- शादी डॉट कॉम पोर्टल वरील ओळख करून एका तरुणीला चांगलीच महागात पडली. शादी डॉट पोर्टल वरील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने गिफ्ट म्हणून पार्सल पाठवले आहे ते कस्टम ऑफिस मधी अडकले आहे व टेररिस्ट अॅक्ट नुसार कारवाई होईल असे सांगून वेगवेगळे व फी चे नाव सांगून अडीच लाखांना गंडा घातला.
याप्रकरणी अलिशा भगवान मेश्राम (वय ३१, रा. वाकड) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०१८ ते ११ मे २०१८ दरम्यान घडला. अलिशा यांची शादी डॉट कॉम या पोर्टलवरुन एका तरुणाशी ओळख झाली होती. त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्यासाठी एक गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर ते कस्टममध्ये अडकल्याचे सांगून त्यावर टेररिस्ट अॅक्टनुसार कारवाई होईल, अशी भिती दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळे कर व फीच्या नावाखाली २ लाख ४७ हजार रुपये बँक खात्यात भरायला सांगून त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.