पुणे,दि.०६ :- पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ दरोडेखोर टोळीला डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांनी आरोपींना शिताफीने अटक केली. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचा सन्मान केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, डेक्कन परिसरातील नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ 8-9 मुले काहीतरी योजना आखत आहेत. अहिवळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात मोकळे मैदान असल्याने आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अहिवळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यातील रात्र गस्तीवर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा कवटीकवार यांची मदत मागितली. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याचे समजताच आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा काही अंतर पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे (वय-२९ रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे (वय-२३ रा. नवी पेठ, पुणे), सुनिल बाबासाहेब कांबळे (वय-२० रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), अश्रु खंडु गवळी (वय-१९ रा. दांडेकर पुल), रोहित चांदा कांबळे (वय-१९), रोहन किरण गायकवाड (वय-१९ पाटील इस्टेट, शिवाजीनगर), किरण सिताप्पा खेत्री (वय-२० रा. कात्रज), ओंकार बाळु ननावरे (वय-२१ रा. राजेंद्रनगर,पुणे), शाम विलास लोखंडे (वय-२० रा. नवी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी कोयता,चाकू तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी (दि.४) संभाजी उद्यानाच्या मागील मुठा नदीपात्रात केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,प्रविण कुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, संदिप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, वसंत कुवर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, गुन्हे उपनिरीक्षक.महेश भोसले,
महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार पोलीस अंमलदार सिध्देश्वर वाघोले, रामकृष्ण काकड, श्रीकृष्ण सांगवे, विकास सराफ आणि डेक्कन पोलिस ठाणेकडील पोलीस अंमलदार अशोक इनामदार, गणेश तरंगे, शेखर कौटकर, निलेश सोनवणे, नागनाथ बागुले, जगदीश तळोले, मिलींद कदम यांनी केलेली आहे.
पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक यांनी वरील कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय येथे बोलावून त्यांचा सन्मान केला आहे.