• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, October 1, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home क्राईम

पुण्यात गुन्हेगारांची झाडाझडती; 165 गुन्हेगार अटकेत; कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, व सहआयुक्त. संदीप कर्णिक सहभागी

संपादक:-संतोष राम काळे by संपादक:-संतोष राम काळे
08/07/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
पुण्यात गुन्हेगारांची झाडाझडती; 165 गुन्हेगार अटकेत; कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, व सहआयुक्त. संदीप कर्णिक सहभागी
0
SHARES
311
VIEWS

पुणे,दि.०८:- पुणे शहरात पोलिसांनी आठवड्यात दुसऱ्यांदा गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांनी विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक मध्यरात्री शहराच्या वेगवेगळ्या भागास भेट देऊन नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेतला. पोलीस आयुक्तांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील चौक्यांना भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मध्यरात्री शहरातील १६५ गुन्हेगारांना अटक केली.
शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानक, हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. मध्यरात्री संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा, तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पथके नाकाबंदी मोहिमेत सहभागी झाले होते. वाहतूक शाखेने १८२२ वाहनचालकांची तपासणी केली. नियमभंग करणाऱ्या ५६८ वाहनचालकांवर कारवाई करुन चार लाख ६३ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहराच्या वेगवेगळ्या भागातील १९९४ सराइतांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६९५ सराईत राहत्या ठिकाणी सापडले. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, कोयते, तलवारी अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. जुगार अड्डे, तसेच गावठी दारु अड्ड्यांवर छापा टाकरण्यात आला. दि ०७/०७/२०२३ रोजी २०.०० ते दिनांक ०८/०७/२०२३ रोजी ०१.०० वा. पर्यत कोंबिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केलेली आहे.
परिमंडळ १ मधील एकुण ६ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई
परिमंडळ १ मध्ये मपोका १४२ प्रमाणे २ केसेस करुन २ आरोपींना अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन प्रमाणे ६ केसेस करण्यात आलेल्या असुन ६ आरोपींकडुन रु. ३४३०/- चा तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण ६ केसेस करुन १५ आरोपींकडुन रु. १०,७९०/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

परिमंडळ २ मधील एकुण ६ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई
विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ – २ मध्ये गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले एकुण १२ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तसेच मोक्का मधील पाहीजे असलेला १ आरोपीस अटक केली आहे. मपोका १४२ प्रमाणे १ केस करुन १ आरोपी अटक केला आहे. तसेच प्रोव्हिबिशन प्रमाणे १२ केसेस करण्यात आलेल्या असुन १२ आरोपींकडुन रु. ८,४१०/- चा तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण ४ केसेस करुन ७ आरोपींकडुन रु. १५,९८०/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे..

परिमंडळ ३ मधील एकुण ६ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई
विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ – ३ मध्ये एकुण प्रोव्हिबिशनमध्ये एकुण १५ केसेस करुन १५ आरोपीकडुन रु. १३,७४०/- चा तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण २ केसेस करुन ३ आरोपींकडुन रु. १,९००/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

परिमंडळ ४ मधील एकुण ७ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई
विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ -४ मध्ये मपोका १४२ प्रमाणे १ कारवाई करुन १ आरोपी अटक केला आहे. तसेच प्रोव्हिबिशनमध्ये एकुण १४ केसेस करुन १४ आरोपीकडुन रु.
१२,४१५/- चा तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण ८ केसेस करुन २२ आरोपींकडुन रु. १५,९८५/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

परिमंडळ ५ मधील एकुण ७ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई
विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ-५ मध्ये प्रोव्हिबिशन अॅक्ट प्रमाणे एकुण १२ केसेस मध्ये १२ आरोपी यांना अटक करुन त्यांचेकडुन रु. ८,५०५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण १ केस करुन १ आरोपींकडुन रु. ७४०/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एनडीपीएस प्रमाणे १ कारवाई करुन १ आरोपीकडुन ४५० ग्रॅम गांजा रु. २,८५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुणे शहर गुन्हे शाखेची कारवाईगु न्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये मपोका १४२ प्रमाणे १ कारवाई करुन १ आरोपीस अटक केली आहे. त्याचप्रमाणे एनडीपीएस प्रमाणे २ कारवाई करुन २ आरोपीकडुन एकुण ४१० ग्रॅम गांजा, ३ किलो ५१५ ग्रॅम बंटा, ६ किलो १६७ ग्रॅम अफीमच्या बोंड्यांचा चुरा रु.२६,०००/- व मोबाईल असा एकुण रु. १,७५,८५५/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील अधिकारी. सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा १. श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट ३, गुन्हे शाखा, पोउपनि पवार हे म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करीत होते. रोझरी स्कुलजवळ ८ ते १० संशयित आरोपी हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेकडील पथक आणि आरोपी यांचेमध्ये झटापट झाली त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले त्यानंतर पोलीसांनी फायरिंग करुन ५ आरोपींना ताब्यात घेतलेले आहे इतर आरोपीची शोध मोहिम चालु आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगार आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात ५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन १ गावठी कट्टा त्यामध्ये ४ जिवंत राऊंड २ लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी हातोडा, लोखंडी पाईप, लोखंडी पकड, कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर विशेष मोहिमे दरम्यान एकुण कारवाईचा आढावा घेतला असता खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.खडक, शिवाजीनगर, विश्रामबाग, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, हडपसर व कोंढवा पोलीस स्टेशनने बेलेबल व नॉन बेलेबल वारंट बजावणी उत्कृष्टपणे केलेली आहे.

> मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट प्रमाणे एकुण गुन्हे शाखेने १४ कैसेस करुन १४ आरोपींकडुन रोख व गावठी दारु असा रु. ३९,९३०/- व पोलीस स्टेशनने ५९ केसेस करुन ५९ आरोपींकडुन रु. ४६,५००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> महा. जुगार अॅक्ट प्रमाणे पोलीस स्टेशनने २१ केसेस करुन त्यामध्ये ४८ आरोपींना अटक करुन जुगार साहित्य व रोख रु. ४५,३९५/- व गुन्हे शाखेने जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण २ केसेस करुन ७ आरोपींकडुन रु. १४,७१०/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
> सीआरपीसी कायदा १५१ ( १ ) प्रमाणे १९ आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
सीआरपीसी कायदा १५१ (३) प्रमाणे ३ आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
> तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १४२ प्रमाणे गुन्हे शाखेने ५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे.
महा. जुगार अॅक्ट प्रमाणे पोलीस स्टेशनने २१ केसेस करुन त्यामध्ये ४८ आरोपींना अटक करुन जुगार साहित्य व रोख रु. ४५,३९५/- व गुन्हे शाखेने जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण २ केसेस करुन ७ आरोपींकडुन रु. १४,७१०/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सीआरपीसी कायदा १५१ (१) प्रमाणे १९ आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
सीआरपीसी कायदा १५१ (३) प्रमाणे ३ आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे..
> तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १४२ प्रमाणे गुन्हे शाखेने ५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे.
> पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकुण ३४८ हॉटेल, ढाबे व लॉजेस चेक, तसेच ११८ एस टी स्टॅण्ड / रेल्वे स्थानक / निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले आहे.
वाहतुक शाखेकडून १८२२ संशयित वाहन चालकांना चेक करुन ५६८ जणावर वाहन धारकांवर कारवाई करुन रु. ४, लाख ६३, हजार ०५० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांचे आदेशान्वये, पोलीस सहआयुक्त, संदीप कर्णिक, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,रंजन कुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ४, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -५, विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग, विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाणेकडील अधिकारी / अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी / अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे उपरोक्त कामगिरी केली आहे. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येवून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त, रितेश कुमार, व पोलीस सहआयुक्त, संदीप कर्णिक, पुणे शहर यांनी स्वत ऑल आऊट ऑपरेशन (कोम्बिंग ) मध्ये सहभाग घेऊन वेगवेगळया ठिकाणी भेटी देवुन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

Previous Post

दरोड्याच्या तयारीतील आरोपी गजाआड, CP.रितेश कुमार,Jt CP. संदीप कर्णिक यांच्याकडून डेक्कन व शिवाजी नगर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post

आता नागरिक थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी 8975953100 या नंबरवर व्हॉट्सॲप करा -पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार

Next Post
आता नागरिक थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी  8975953100 या नंबरवर व्हॉट्सॲप करा -पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार

आता नागरिक थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी 8975953100 या नंबरवर व्हॉट्सॲप करा -पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार

विषय

  • ई.पेपर (17)
  • क्राईम (1,410)
  • क्रीडा (123)
  • ठळक बातम्या (2,584)
  • तेली समाज वधु वर परिचय (5)
    • वधु (1)
    • वर (1)
  • निधन वार्ता (31)
  • मनोरंजन (155)
  • राजकीय (467)
  • राज्य (1,491)
  • राष्ट्रीय (28)
  • व्यवसाय जगत (141)
  • सामाजिक (708)

Categories

ई.पेपर (17) क्राईम (1410) क्रीडा (123) ठळक बातम्या (2584) तेली समाज वधु वर परिचय (5) निधन वार्ता (31) मनोरंजन (155) राजकीय (467) राज्य (1491) राष्ट्रीय (28) वधु (1) वर (1) व्यवसाय जगत (141) सामाजिक (708)
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us