पिंपरी चिंचवड,दि.०८:- भोसरी येथील मोहननगर येथे एका घरातून भोसरी पोलिसांनी चार लाख 52 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) रात्री साडेआठ वाजता करण्यात आली.
भोसरी)अभिजीत उर्फ पप्पु गंगाराम भोर वय ४० वर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अभिजित भोर याने विक्रीसाठी साठवून ठेवला. हा गुटखा त्याने त्याच्या भाड्याच्या खोलीत ठेवला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चार लाख 52 हजार 150 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. पुढिल तपास पोउपनि जोनापल्ले करीत आहेत.