पुणे,दि.११:- लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून भाजपचं 45 जागा मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळणार आहे, असा अहवाल जाहीर झाला आहे. लोक पोलने केलेल्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
हा अहवाल सध्या व्हायरल होत आहे.
लोक पोल या एक्स पोस्टवरील अकाउंटवरून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. या संस्थेने प्रत्येक लोकसभा क्षेत्रात सरासरी 1350 मतदारांशी चर्चा केली. त्यानंतर मतदारांनी व्यक्त केलेल्या मतांच्या आधारे हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यात महायुतीला निम्म्या म्हणजे 21 ते 24 जागाच मिळणार आहेत. त्यातही भाजपकडे सगळ्यात जास्त म्हणजे 14 ते 17 जागा असतील.महाविकास आघाडीला 23 ते 26 जागा मिळणार आहेत, असंही या अहवालात म्हटलं आहे.