मुंबई,दि.२८ :- पुण्यातील पब व बार वर कारवाईनंतर आता मुंबईतील पब आणि बारवरदेखील कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिका, राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची तपासणी सुरू केली आहे
पोलिसांनी मुंबईत 50 ठिकाणी छापेमारी केली.या छापेमारीत मुंबईतील पवई परिसरात एका बार आणि पबवर पोलिसांनी छापेमारी केली असता. चौकशीत एका अल्पवयीन मुलाला मद्य दिल्या प्रकरणी बारच्या मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल केला आहे. टेक बहादूर आयर (47) आणि वेटर विकास राणा (30) अशी या दोन आरोपींची नावे आहेत पवई पोलिसांनी दोघांवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
बारवरील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील पोलिसांच्या संबंधित परवाना विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील अनेक भागात अनधिकृत पब आणि बार आहे. आणि पुण्यात घडलेल्या प्रकराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत 5 बारमधील अनधिकृत बांधकाम तोडले आहे. बाक अनधिकृत बारवर देखील पोलिसांची आणि महापालिकेची करडीनजर असणार आहे.