पिंपरी चिंचवड ,दि.१० ( प्रतिनिधी संकेत काळे) अवैध रित्या गॅसची चोरी करुन स्फोटास, मानवी जीवीतास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभुत असलेल्या आरोपींना वाकड पोलीसांनी घेतले ताब्यात. ताथवडे येथील गॅस स्फोट प्रकरणी आरोपी यांच्या वर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार या दोघांनी तिरुपती कॅरिअरच्या गॅस टँकर चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत करून दि.०८/१०/२०२३ रोजी २३/२० वाजण्याचे सुमारास, जे.एस.पी.एम. कॉलेज परिसर, ताथवडे येथे,अवैध रित्या गॅसची चोरी करत असताना. गाड़ी क्र GJ 16 AW 9045 मधुन नोजल पाईप द्वारे गॅस चोरुन व्यावसाईक गॅस टाक्या भरण्याचे चालु असताना गॅस लिकिज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले सदर आगीमध्ये जेएसपीएम कॉलेज आवारात पार्क केलेल्या ब्लॉसम स्कुलचे तीन स्कुल बस, गॅसचा टँकर, गॅस चोरुन नेण्यासाठी सिलींडर असलेला टेम्पो इत्यादी जळुन नुकसान झाले व मोठ्या प्रमाणात आग लागून स्फोट होण्याची जाणीव असताना आरोपींनी ही कृती केली. जागामालक चंद्रकांत सपकाळ यांनी नियमितपणे आपली जागा उपलब्ध करून दिली. घटनेनंतर टँकर चालक पळून गेला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
अवैध रित्या गॅसची चोरी करुन स्फोटास, मानवी जीवीतास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभुत असलेल्या तीन आरोपींना वाकड पोलीसांनी घेतले ताब्यात.