पुणे,दि.२९:- बालेवाडी व बाणेर भाग येथील बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल ,पब, चौपाटी, चे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर दि 29/5/2024 रोजी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करून, तेथील पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले. आज दुपारी बांधकाम विभाग झोन तीनच्यावतीने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील फीस्ट इंडिया,दार्जिलिंग कॅफे, ब्र्यू कॅफे, ग्लोबल चस्का,डॉक यार्ड, पंजाबी कॉर्नर,जगदंबा , सर्किट हाऊस,मदारी, इत्यादी हॉटेल्स. व हिप्पी अँड हार्ट,नवाब आशिया, लिट, अपाची हायस्ट्रीट, थ्री मोस्कुटोज इत्यादी पब वर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ५२ हजार ८४८ चौरस फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता -.श्रीधर येवलेकर
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – जयवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता – प्रकाश पवार,
कनिष्ठ अभियंता – विश्वनाथ बोटे, संदीप चाबुकस्वार ,अजित सणस, केतन जाधव व स्टाफ, 4 पोलिस 6 सुरक्षा रक्षक यांच्या पथकाने दोन जेसीबी, दोन गॅस कटर, दोन ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.