पुणे ग्रामीण,दि.२९ :- पुणे जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारुच्या कारखान्यांवर कारवाईची मोहीम राज्य उत्पादन शुल्क जी विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील शिंदवणे गावाच्या हद्दीत राठोड वस्ती ता.हवेली.येथे शुक्रवार दि. २७ रोजी कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुणे
जिल्ह्यात अवैध गावठी दारू कारखाने सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जी आयुक्त वर्दे व अधीक्षक. रजपूत, यांना मिळाली. त्यांनी तात्काळ हे अवैध दारू विक्रीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना अधिकारी यांना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्यांच्या पथकासह पुणे विभागाच्या भरारी पथकांनी त्या ठिकठिकाणी सुरू असलेले अवैध गावठी व हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यांना वर कारवाई केली आहे.
या कारवाईत ५००० लीटर कच्चे रसायन, २८० लीटर गावठी दारू असा एकूण १ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त. वर्दे, व अधीक्षक. रजपूत, तसेच उपअधीक्षक, एस. आर. पाटील, शिंदे, जगदाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक. संजय के. कोल्हे, व दुय्यम निरीक्षक के. एस. ढावरे, आर. आर. वाघ, यांनी केली आहे. सदर कारवाईत सर्व. झोळ, व दिंडे, सहा. दु. नि. मोडक आणि सर्व जवान. अमोल कांबळे, संतोष गायकवाड, दत्तात्रय अबनावे व महिला जवान श्रीमती प्रिया चंदनशिवे यांनी सहभाग घेतला.