पुणे, दि. ८ :.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध यांच्यावतीने भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी सभागृह औंध गाव येथे १० जून रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ या वेळेत इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात १० वी व १२ वी नंतर करिअर कसे निवडावे, शिक्षणाच्या विविध संधी कशा उपलब्ध होवू शकतील या विषयावर मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार असून सचित्र प्रदर्शन, आयटीआय कोर्स व पुढील शिक्षण, १२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व स्वयंरोजगाराबाबत माहिती देणारे स्टॉल असणार आहेत.
प्रामुख्याने इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी जास्तीत जास्त संख्येने भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी सभागृह, बॉडी गेट बस स्टॉप जवळ, औंध गाव येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर.बी. भावसार यांनी केले आहे.