पुणे,दि.१४ :- झुंजार ऑनलाइन पुण्यातील बेकायदेशीर हॉटेल पबवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग. पुणे कार्यालयाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अल्पयीन मुलांना मद्य पुरवठा, हॉटेल आवारात मद्य सेवा, विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या 142 हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापैकी 68 हॉटेल, पबचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे.
उत्पादन शुल्कच्या तपासणीत जर कोणी अल्पवयीन मुलांना मद्य देताना आढळून आल्यास संबंधित हॉटेल, पबचा परवाना रद्द करणार असल्याची माहिती पुणे उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील यांनी दिली आहे.
पुणे पालिकेकडून अनधकिृत बार व पबवर कारवाई करण्यात येत आहे. तर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याप्रकरणी पब चालक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, मद्य पिण्याचा परवाना नसणे,
हॉटेल-पब आवारात मद्य सेवा देणे अशा विविध कारणांसाठी 142 हॉटेल, पबवर कारवाई केली. त्यापैकी 68 हॉटेल,
पबचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे
उपअधीक्षक सुजित पाटील यांनी दिली.