पुणे,दि.०७ :- पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात हॉस्टेल मध्ये व भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप व मोबाई व रूममधील महागड्या वस्तू चोरणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली
त्याच्याकडून चोरीचे १३ लॅपटॉप, ७ चार्जर,१ कॅमेरा, दोन दुचाकी असा ६ लाख ४४ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुण्यातील वारजे माळवाडी, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ आणि रायगड जिल्ह्यातील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. अर्जुन तुकाराम झाडे (वय २२, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
झाडे हा उच्चशिक्षित आहे. त्याने कृषीविषयक अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. पण, मौजमजा करण्यासाठी त्याने चोरी केल्याचे तो सांगत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वारजे भागात विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप तसेच इतर साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणातील दाखल गुन्ह्यांचा तपास वारजे माळवाडी पोलिसांकडून सुरू होता.
दरम्यान, एका गुन्ह्याचा तपास करताना पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच, तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा त्यावरून लॅपटॉप चोरीचे गुन्हे झाडेने केल्याचा संशय आला. त्यानूसार पोलिसांनी झाडेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या रूमची झडती घेतली. तेव्हा लॅपटॉप व इतर वस्तू दिसून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी लॅपटॉप पाहणी केली असता चोरी गेलेले लॅपटॉप त्याच्याकडे आढळून आले. पोलीसी खाक्या दाखविताच त्याने शहरातील सिंहगड, वारजे तसेच भारती विद्यापीठ भागात लॅपटॉप तसेच यापुर्वी रायगड येथे महाड व माणगाव येथून दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
तसेच आरोपी नामे प्रतिक मांडेकर व ऋषिकेश शिर्के, दोघे, रा. मावळे आळी, कर्वेनगर, पुणे यांचा गोपनीय बातीमीदारा मार्फतीने शोध घेवून, त्यांचेकडुन वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल गुन्ह्यातील चोरीचे ०२ लॅपटॉपचा शोध घेवून, सदरचे लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०३, सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे, भिमराव टेळे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल जैतापुरकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे), अजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक, नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार, प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांनी केली आहे.
दि.०६/११/२०२३ रोजी जप्त मुद्देमाल गुन्हयातील फिर्यादी यांना पुणे शहर पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांचे हस्ते परत करण्यात आलेला आहे. सदर कामगिरी बाबत पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांनी वरील पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांचे अभिनंदन केले आहे. सदर वेळी पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०३, सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे, भिमराव टेळे हे उपस्थित होते.